पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी 'राष्ट्रवादी'ची 29 ला बैठक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पुणे  - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी 29 एप्रिलला पुण्यात सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कार्यकाल संपत आला आहे. या पदासाठी आपल्या नावाचा पुन्हा विचार करू नये, असे त्यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे या सर्वसाधारण बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील हे काम पाहणार आहेत. पक्षाचे विधी मंडळातील नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नेते जयंत पाटील, गणेश नाईक, मधुकर पिचड, अरुण गुजराथी, भास्कर जाधव, सचिन आहिर, जयदेव क्षीरसागर, फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, चित्रा वाघ, अनिल देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीवेळी शरद पवार हे सद्यराजकीय स्थितीवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते अकुंश काकडे यांनी कळविली आहे.

Web Title: Office bearer selection NCP meeting politics