इंदापुरातील पोलिस पाटलांचे थोरातवाडी परिसरात श्रमदान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

भवानीनगर : इंदापूर तालुक्‍यातील पोलिस पाटील आज थोरातवाडी येथे सकाळी झाडून एकसाथ आले. त्यांची तहसीलदारांसमवेत अनौपचारिक शासकीय बैठक झाली आणि सर्वांनी मिळून 104 घनमीटर खोदकाम करून पावसाळ्यात 20 लाख लिटर पाणी साठेल एवढे काम केले. 

भवानीनगर : इंदापूर तालुक्‍यातील पोलिस पाटील आज थोरातवाडी येथे सकाळी झाडून एकसाथ आले. त्यांची तहसीलदारांसमवेत अनौपचारिक शासकीय बैठक झाली आणि सर्वांनी मिळून 104 घनमीटर खोदकाम करून पावसाळ्यात 20 लाख लिटर पाणी साठेल एवढे काम केले. 

दुष्काळमुक्तीसाठी कंबर कसलेल्या इंदापूर तालुक्‍यात शासकीय अधिकारीही मागे राहिलेले नाहीत. आज दोन मोर्चे व वाळूमाफियांवरील कारवाई करूनही न थकलेल्या तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी थेट थोरातवाडीतच पोलिस पाटलांना भेटण्याचे ठरवले आणि तालुक्‍यातील 60हून अधिक पोलिस पाटील थोरातवाडीत आले. यात महिला पोलिस पाटीलही सहभागी होत्या. त्यांच्या जोडीने आसपासच्या गावांचे ग्रामस्थही आले आणि सकाळपासूनच श्रमदानाला सुरवात झाली. भवानीनगर परिसरातील "रास्ता रोको'चे निवेदन स्वीकारून तहसीलदार श्रीकांत पाटील थेट थोरातवाडीत आले आणि त्यांनी श्रमदानास सुरवात केली. श्रमदान झाल्यानंतर पाटील यांनी पोलिस पाटलांची तेथेच बैठक घेतली व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना पुढील कामाची रूपरेषा समजावून सांगितली. 

थोरातवाडीचे पोलिस पाटील अनिल नगरे यांनी संपूर्ण गावची मातीपरीक्षणाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. या वेळी गावच्या सरपंच राणी थोरात, माजी सरपंच केशव नगरे, उपसरपंच शैलजा पवार, सुभाष थोरात, शिवाजी पवार, दिनेश थोरात, राजेंद्र जगदाळे, बाळासाहेब नगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Office bearers worked together for rain water harvesting in Indapur