लाच घेतल्याप्रकरणी अधिकाऱ्यास कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - रेशीम उद्योगासाठी अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केलेल्या रेशीम विकास विभागाच्या अधिकाऱ्यास न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याप्रकरणी बारामती येथील एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार प्रणिता सतीश संखे-पांडे (वय 40, रा. रेशीम शासकीय वसाहत, वाकडेवाडी) यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्यासमोर बुधवारी हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने त्यांची 20 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

तक्रारदार शेतकऱ्याचा रेशीमशेतीचा व्यवसाय असून, त्यांच्या आईला रेशीमशेतीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत 87 हजार 500 रुपये अनुदान मंजूर झाले होते. हे पैसे देण्यासाठी पांडे यांनी दहा हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

Web Title: officer arrested bribe case