अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Sakal-Followup
Sakal-Followup

पुणे - तलावांतील जलपर्णी काढण्याच्या २३ कोटी रुपयांच्या बिनबोभाट निविदेचा ‘सकाळ’मधील वृत्तामुळे बोभाटा होताच ही निविदा रद्द झाली. परंतु, नसलेल्या जलपर्णीचा प्रस्ताव कोणी मांडला, निविदेचे दर फुगले कसे ?  ‘एस्टिमेट कमिटी’ आणि जबाबदार अतिरिक्त आयुक्तांनी त्यावर आक्षेप का घेतले नाहीत, असे अनेक प्रश्‍न आता जलपर्णीच्या बनावट निविदेवरून विचारले जात आहेत. पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आणि निविदा काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार ? अशी विचारणाही होत आहे.

शहरातून वाहणारी मुळा-मुठा नदीसह तलाव आणि ज्या भागांत जलपर्णी उगवते ती काढण्यासाठी महापालिकेतर्फे जलपर्णी काढण्यात येते. त्यासाठी अर्थसंकल्प आर्थिक तरतूद करण्यात येते. त्यानंतर ठेकेदाराची नेमणूक केली जाते. त्यानुसार दरवर्षी साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदा गेल्या वर्षीच्या ठेकेदारांकडूनच मुळा-मुठेसह पाषाण तलाव आणि कात्रज येथील नानासाहेब पेशवे आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील उद्यानातील जलपर्णी काढली आहे. तरीही, केवळ तीन तलावांत जलपर्णी असल्याचे दाखवून महापालिका प्रशासनाने तब्बल २३ कोटींची निविदा काढली आणि तिला स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्याच्या हालचाली केल्या. दरम्यान, एकाही तलावात थोडी जलपर्णी नसल्याचे ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी उघडकीस आणले. त्यानंतर महापालिकेने ही निविदा रद्द केली होती. 

मुळात, अशा प्रकारची निविदाच का काढली, ती काढल्यानंतर मंजुरीपर्यंत नेण्याला कोणत्या वरिष्ठ पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी बळ दिले आणि मंजुरीनंतर नेमके कोणाचे भले होणार होते ? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे स्वत:च्या फायद्यासाठी पुणेकर आणि महापालिकेची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होणार का, हा मुद्दा आहे.

वाहन खात्‍याचा संबंध काय ? 
जलपर्णी काढण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची आहे. मात्र, २३ कोटींची निविदा काढली ती महापालिकेच्या वाहन विभागाने. ही निविदा या खात्याने का काढली, या खात्याचा संबंध काय ? याचे उत्तर या खात्याच्या प्रमुखांकडे नाही. महापालिकेच्या वाहनांची देखरेख ही या खात्याची जबाबदारी आहे. जलपर्णीच्या कामांवर  कोणाचे लक्ष नसते आणि ही कामे दिसून येत नाही, अशा भ्रमात राहूनच या खात्याचे प्रमुख किशोर पोळ यांनी ही निविदा काढली.

या ठेकेदारांना द्यायची होती कामे 
  स्वामी समर्थ कन्स्ट्रक्‍शन (कात्रज तलाव)
  स्वयंभू ट्रान्स्पोर्ट (पाषाण तलाव)
  मोरया डेव्हलपर्स (नानासाहेब पेशवे, तलाव) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com