इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील बोलतात आठ भाषा

राजकुमार थोरात
शुक्रवार, 25 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना एक-दोन नव्हे तर चक्क आठ भाषा बोलत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी भविष्यात नवनवीन भाषा व काम करण्याच्या पद्धती शिकण्याची उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 

वालचंदनगर (पुणे) : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना एक-दोन नव्हे तर चक्क आठ भाषा बोलत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी भविष्यात नवनवीन भाषा व काम करण्याच्या पद्धती शिकण्याची उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे मुळ गाव जत तालुक्यातील सनमडी आहे. सुरवातीपासुन त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व आहे.तसेच ते चांगल्या प्रकारची हिंदी ही भाषा बोलू शकतात. जत तालुक्यातील मूळ गाव असल्यामुळे त्यांना कर्नाटकातील कन्नड भाषा ही चांगल्या प्रकारे बोलता येते.  नोंव्हेबर २००७ मध्ये गडचिरोलीमधील नक्षलवादी भागामध्ये  पाटील यांची पोस्टिंग झाली. गडचिरोलीमध्ये आदिवासी लोकांची संख्या जास्त अाहे. तसेच नक्षलवाद्यी आहेत. येथील बहुतांश नागरिक गोंडी  व माडी भाषा बोलत असतात. तसेच या भागामध्ये बांगलादेशातील अनेक नागरिक राहत असल्याने त्यांनी बंगाली भाषा ही बाेलली जाते.

गडचिरोलीमध्ये तेलगू भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरवातीपासुन त्यांना नवीन काहीतरी शिकण्याची व सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी गडचिरोलीमध्ये जाताच तेथील नागरिकांची स्थानिक भाषा शिकण्यास सुरवात केली. पाच वर्षामध्ये ते  चांगल्या प्रकारे तेलगू,बंगाली, गोंडी, माडी भाषा बोलू लागले. व आदिवासी नागरिकांमध्ये राहुन त्यांच्या अडचणी जाणून घेवून तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करु लागले. पाच वर्षामध्ये ते गडचिरोलीमध्ये नागरिकांचा एक अविभाज्य घटक बनले होते. २०१३ मध्ये त्यांची सांगोला जिल्हामध्ये तहसीलदार म्हणून नियुक्ती झाले. सुरवातीपासुन त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत आहे. २०१६ पासुन ते इंदापूरचे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा तालुक्यातील वाळू माफियांना धसका घेतला असून त्यांच्या कामावरती प्रशासन खुष अाहे. दौंड तालुक्यातील वाळू माफियांना चपराक देण्यासाठी त्यांच्याकडे दौंडचा वाळू चोरी रोखण्याची अतिरिक्त कारभार ही देण्यात आला आहे. 

नागरिकांच्या विकासासाठी स्थानिक भाषा येणे गरजेचे - श्रीकांत पाटील, तहसीलदार इंदापूर 

समाजातील सर्वसामान्य नागरिकांचा, तळागाळातील जनतेचा विकास करायाचा असलेल तर त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे असते.गडचिरोलीमधील नागरिकांच्या अडचणी समाजावून घेवून त्या सोडविण्यासाठी तेथील नागरिकांची स्थानिक भाषा शिकलो होते.व भविष्यातही नागरिकांच्या विकासासाठी नवनवीन गोष्टी शिकणार असल्याचे सांगितले.

Web Title: officer of indapur tehsil knows 8 languages