पुण्यात राहण्यासाठी अधिकाऱ्यांची ‘फिल्डिंग’

पुण्यात राहण्यासाठी अधिकाऱ्यांची ‘फिल्डिंग’

पुणे - लोकसभा निवडणूकाजवळ आल्यामुळे महसूल प्रशासनात सध्या बदल्यांची गडबड सुरू झाली आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्या होणाऱ्या असल्यामुळे अनेकांनी पुण्यातच राहण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरवात केली आहेत, तर काही जणांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत आपली वर्णी लावावी, यासाठी राजकीय नेत्यांचा दबाव आणण्यास सुरवात केल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता पुढील महिन्यात लागू होण्यासाठी शक्‍यता आहे. एकाच ठिकाणी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेल्या, जिल्ह्यातील निवासी असलेल्या आणि निवडणुकीशी संबंधित असलेल्या उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कराव्या लागणार आहे. या दर्जाच्या अधिकऱ्यांच्या बदल्याचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून बदल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहेत. त्यामध्ये बहुतांश उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्या या पुणे जिल्ह्याबाहेर प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात ठाण मांडलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहेत.

विभागीय आयुक्त या दबावाला बळी पडणार का, जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखविणार का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

वशिल्यासाठी प्रयत्न
बदल्यांची संभाव्य ठिकाणाची माहिती मिळताच या अधिकाऱ्यांनी राजकीय वशिला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मंत्र्यांच्या पत्रापासून ते मंत्रालयातून थेट दबाव आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com