बापरे! संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सारथीच्या अधिकाऱ्यांना डांबले

Sambhaji-Brigade
Sambhaji-Brigade

पुणे - पुण्यातील राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेवर (सारथी) राज्य सरकारने निर्बंध आणण्याचे, तसेच निधी रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याविरोधात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी दालनात कोंडले.

सरकारच्या या परिपत्रकाविरुद्ध ब्रिगेड आक्रमक झाली असून, सरकारची ही कृती मराठा समाजाचे खच्चीकरण करणार आहे. त्यामुळे हे परिपत्रक त्वरित रद्द करावे. त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर अडथळे आणि दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

सारथीला स्थापन होऊन नऊ महिने झाले आहेत. मंत्रालयातील सचिव जे. पी. गुप्ता यांनी या संस्थेकडे दोन वर्षांचा हिशेब मागितला आहे. कारभाराच्या चौकशीसाठी समितीही नेमली आहे. संस्थेच्या योजनांना सरकारकडून मान्यता घेतली होती का, अशी विचारणा केली आहे. मात्र, या संस्थेचे धोरण सरकारनेच निश्‍चित करून दिले आहे. ते वाचण्याचीदेखील तसदी या सचिवांनी घेतली नाही. याबद्दल सविस्तर खुलासा पाठविला आहे. तरीही संस्थेचा निधी रोखल्याचे संस्थेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, महासंचालक डी. आर. परिहार यांना निवेदन दिले. मराठा, कुणबी समाजाच्या उद्धारासाठी सारथी अस्तित्वात आली. वर्षही झाले नाही, तोच दोन वर्षांचा अहवाल सरकारने मागितला आहे. यातून सारथीची स्वायत्तता धोक्‍यात आली आहे. यातून मराठा समाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही, तर संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com