अधिकाऱ्यांनी लक्षपूर्वक काम करावे : विश्वास देवकाते

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 18 मे 2018

जुन्नर (पुणे) : तालुक्यातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती हा मोठा प्रश्न असल्याचे खरीप हंगामाच्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांनी लक्षपूर्वक काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी येथे दिला.

आज (ता.18) शुक्रवारी जुन्नर येथे झालेल्या खरीप हंगाम व पाणी टंचाई बैठकीस उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, शरद लेंडे, पांडुरंग पवार, देवराम लांडे, अंकुश आमले, अतुल बेनके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, सभापती ललिता चव्हाण, दिलीप गांजाळे, काळू गागरे गटविकास अधिकारी सतीश गाढवे, कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, विजय खेडकर शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते. 

विवेक वळसे पाटील म्हणाले, अधिकारी वर्गाबाबत  तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी मॉक ड्रिल घेऊन कामाची वस्तुस्थिती जाणून घ्यावी.  

कृषी सभापती सुजाता पवार म्हणाल्या, शेतकरी वर्गाच्या पाठीशी जिल्हा परिषद नेहमीच राहील. गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. खते बी बियाणे वेळेवर उपलब्ध होईल. बचत गटांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाईल. कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी कृषी योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा कुटे यांनी केले. आभार ललित चव्हाण यांनी मानले. 

Web Title: officers should work with concentration said vishwas devkate