पक्षाच्या कार्यक्रमांमुळे भाजप पदाधिकारी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

स्वतःच्या खिशातून खर्च
हा सप्ताह संपत नाही, तोच २२ सप्टेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष जे. पी. नड्डा पुण्यात येणार आहेत. त्यांच्या बैठका, सभा 
आदी कार्यक्रमांचे नियोजन पक्षाकडून करण्यात आले आहे. त्याचीही जबाबदारी येऊन पडली आहे. सततचे कार्यक्रम आणि त्यासाठी 
खिशातून घालावा लागणारा पैसा यामुळे अनेक जण खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत.

पुणे - सदस्य नोंदणी अभियान, महाजनादेश यात्रा होत नाही, तोच आता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह असे एकापाठोपाठ केंद्र आणि प्रदेशाकडून कार्यक्रम येत असल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची दमछाक होत आहे. त्यामुळे खासगीत अनेक जण याबद्दल नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

चार ते पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीसाठी पक्षाकडून भरघोस कार्यक्रम नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरापासून विधानसभेची तयारी पक्षाने सुरू केली आहे.

पक्षाकडून एकापोठापाठ कार्यक्रमाचे दिले जात असताना त्यांचा आढावादेखील घेतला जात आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि नगरसेवकांचा दम निघाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्याचा आदेश दिला आहे. आरोग्य शिबिरांसारखे भरगच्च कार्यक्रम ठरवून देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers suffer by BJP Party Event