रिंगरोडवरील अधिकृत बांधकामेही हटविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - राज्य सरकारच्या नगर रचना विभागाकडून रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावर ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात आली आहे, त्या बांधकामांवर कारवाई करून ती हटविण्याबरोबरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी रिंगरोडच्या मार्गात बदल न करण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे.

 प्रादेशिक आराखड्यात १९९७ मध्ये दर्शविण्यात आलेला रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. 

त्यास राज्य सरकारनेदेखील मान्यता दिली आहे; परंतु या प्रस्तावित मार्गावर काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यापैकी काही अनधिकृत आहेत, तर काही ठिकाणी नगर रचना विभागाकडूनच बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये धायरी येथील बांधकामांचादेखील समावेश आहे. या बहुतांश ठिकाणी रिंगरोडच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार मार्गात बदलही करण्यात आला होता; परंतु त्यास विरोध होऊ लागला आहे.

या पार्श्‍वभूमीवर रिंगरोडच्या प्रस्तावित मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार आहे; तसेच नगर रचना विभागाने परवानगी दिलेली बांधकामेदेखील हटविण्यात येणार आहेत. 

रिंगरोडच्या मार्गावर नगर रचना विभागाकडून परवानगी देण्यात आलेल्या बांधकामांवरही कारवाई करण्यात येणार आहे; तसेच चुकीची परवानगी दिली असेल, तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: official buildings on the ring road will also be removed