अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची हतबलता कायम

संतोष आटोळे 
गुरुवार, 29 मार्च 2018

शिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील ब्रिटिश कालीन तलावातून गेल्या वर्षभरापासुन दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपशामुळे येथील स्थानिकांच्या शेतीसह ग्रामपंचायतीच्याही पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन फुटुन नुकसान होत आहे. याबाबत दै.सकाळने सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले.

शिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील ब्रिटिश कालीन तलावातून गेल्या वर्षभरापासुन दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपशामुळे येथील स्थानिकांच्या शेतीसह ग्रामपंचायतीच्याही पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन फुटुन नुकसान होत आहे. याबाबत दै.सकाळने सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले.

याचा परिणाम प्रांताधिकारी यांनी बैठक घेत धडक कारवाईची घोषणा केली. यानंतर फक्त आठ दिवस  अवैध वाळु उपसा थांबला मात्र आता पुन्हा भर दुपारीच मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु आहे.याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नाही. प्रशासनाच्या या हतबलतेमुळे वाळु माफिया मात्र फोफावले आहेत.यामुळे याबाबात जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.

याबाबत  दिवसाढवळ्या बेसुमार वाळुची चोरी सुरु आहे. ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात सीसीटीव्ही असतानाही याला न जुमानता वाळु चोरी जोरात सुरु आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून वाळूमाफियांचे पेव फुटले आहे.पाटबंधारे विभागांसह महसूल व पोलिस व परिवहन विभागकडूनच या उपशाला छुपा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे.यामुळे अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्थानिक शेतकर्‍यांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे.

वाळूच्या वाहनांची सतत वर्दळ असल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील पाईपलाईनचे नुकसान झाले आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्याही झालेल्या नुकसानीचा प्रश्न तसाच आहे. तर सध्या तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यावर खासदार शरद पवार यांच्या निधीतून सिमेंट बंधारा काम सुरु आहे.यासाठी खोदकाम करण्यात आले.मात्र वाळू माफियांनी सदर खोदकामालगतच उपसा करुन कामाची लाईनआऊटच बिघडवून टाकली आहे.

माफियांची दादागिरी एवढ्यावरच थांबली नाही गेल्या आठवड्यात  बारामतीकडे जाणाऱ्या अवैध वाळू च्या गाडीवर महसुलचे अधिकारी कारवाई करण्यासाठी आले यावेळी संबंधित माफियांनी बारामती एमआयडीसी परिसरातील परिवहन विभागापासुन हाकेच्या अंतरावरावरच रस्त्याच्या मध्यभागी गाडी मोकळी करुन पळ काढला. यामुळे  भर रस्त्यात तब्बल आठवडाभर वाळूचा ढिकारा तसाच होता.अनेक अपघात झाले. यानंतर प्रशासनाने वाळू रस्त्यावरुन बाजुला केली.मात्र कारवाई दूरच राहिली.

एकीकडे शासन वाळूमाफियांना मोका लावण्याची भाषा करत आहे. मात्र बारामतीत महसुलसह पोलिस, पाटंबधारे विभागाचे व परिवहन विभागाचे अधिकारी, व पोलिस वाळूमाफियांना मोकळीक देत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Officials are fail to protect illegal sand strains