काय सांगता ! घराघरात सुरू झाल्या चक्क 'ऑफलाइन शाळा' 

मीनाक्षी गुरव 
Sunday, 13 September 2020

कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी शिक्षकांनी आता शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ऑनलाइन शिक्षणाबरोबरच "आउट ऑफ कवरेज' असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शिक्षकांनी 'ऑफलाइन शाळा' सुरू केल्या आहेत.

पुणे : कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी शिक्षकांनी आता शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ऑनलाइन शिक्षणाबरोबरच "आउट ऑफ कवरेज' असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शिक्षकांनी 'ऑफलाइन शाळा' सुरू केल्या आहेत. यामुळे ऑनलाइनअभावी शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रामुख्याने ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क नसणे आणि नेटवर्क असले, तरी पालकांकडे एंड्रॉइड फोन नसणे अशा कारणांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून दुरावण्याची भीती होती. या परिस्थितीत पुढाकार घेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील हजारो शिक्षक घरोघरी जाऊन ज्ञानदिप पेटविण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे ते "शिक्षण दूत' ठरले आहेत. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

धुळे जिल्ह्यातील (ता. धुळे) अंचाडे तांडा येथील जिल्हा परिषदेच्या (पहिली ते चौथी) शाळेत जवळपास 137 विद्यार्थी असून त्यातील वस्तीवर राहणाऱ्या 80 ते 90 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधा मोबाईल आहे. परिणामी शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ऑनलाइन शिक्षण घेणे या विद्यार्थ्यांना शक्‍य होत नसल्याचे वास्तव आहे. मात्र तरीही शिक्षकांनी हार न मानता सर्व नियमांचे पालन करून प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा पवार म्हणाल्या, "तांडा या गावात बहुतेक वेळा मोबाईलला नेटवर्क नसते. शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे ऊसतोडणीचे काम करतात. आम्ही ओट्यावर ऑफलाईन शाळा सुरू केली आहे." पवार या दररोज सकाळी नऊ वाजता घर सोडतात आणि प्रत्येक घरात अर्धा तास शिकवितात. अशाप्रकारे दुपारी एक-दीड वाजेपर्यंत त्या जवळपास 60 ते 70 विद्यार्थ्यांना शिकविणे पूर्ण करतात. त्याशिवाय प्रत्येक गल्लीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी एकाला त्यांनी 'गल्लीमित्र' नेमून दिले आहेत. विद्यार्थ्यांना दिलेला गृहपाठ गल्लीमित्रांकडून तपासून घेतला जातो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यातील मांजरवाडीतील (ता. जुन्नर) जिल्हा परिषदेच्या शाळेतील बबन सानप हे शिक्षकही पवार यांच्याप्रमाणेच कोरोना संकट काळातही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सानप म्हणाले, "सहावी आणि सातवीच्या वर्गातील जवळपास आठ ते दहा विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध नाहीत. म्हणून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवितो तसेच अन्य शैक्षणिक मदतही केली जाते.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Offline schools' started at home