जुन्या बाजारातील कोंडी फुटणार

मंगळवार पेठ - शनिवारवाडा ते शाहीर अमर चौकादरम्यानच्या रस्त्यावर रविवारी भरलेला जुना बाजार. या ठिकाणची दुकाने आतमध्ये हलवून हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी आता मोकळा केला जाणार आहे.
मंगळवार पेठ - शनिवारवाडा ते शाहीर अमर चौकादरम्यानच्या रस्त्यावर रविवारी भरलेला जुना बाजार. या ठिकाणची दुकाने आतमध्ये हलवून हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी आता मोकळा केला जाणार आहे.

पुणे - मंगळवार पेठेत भरणारा जुना बाजार म्हणजे वस्तूंचा खजिना. ज्या वस्तू कोठेच मिळणार नाहीत, त्या हमखास येथे मिळतात. मात्र, हा बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या भागातील दुकानांची पुनर्रचना केली जाणार असून, संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे.

संगणकाचा एखादा सुटा भाग हवाय, स्वस्तात मस्त कपडे हवेत, बागिचासाठी अवजार पाहिजेत, जुन्या परंपरा, संस्कृतीची साक्ष असलेल्या वस्तू हव्या असतील, तर जाणकार मंडळी कोणत्याही दुकानात न जाता थेट बुधवारी आणि रविवारी मंगळवार पेठेतील जुना बाजार गाठतात. त्यामुळे 
गेल्या अनेक दशकांपासून या जुन्या बाजाराची नाळ पुण्याच्या संस्कृतीशी घट्ट आहे. शनिवारवाड्याकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाताना मंगळवार पेठत हा बाजार भरतो. यापूर्वी रस्त्याची संपूर्ण एक बाजू या बाजारामुळे बंद होत. त्यामुळे ससून, आरटीओ, शनिवारवाडा, कामगार पुतळा या भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी महापालिकेने येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुकानदारांशी चर्चा करून अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, आता पुन्हा वाढलेली वाहनांची संख्या, ससून व पुणे स्टेशनला जाणारी वाहने, रुग्णवाहिका यांच्यातही वाढ झाली आहे.

त्यामुळे या भागात पुन्हा वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. यासाठी या बाजारातील संपूर्ण रस्ता रिकामा करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावर बूट, चप्पल, कपडे, बॅंग, लोखंडी वस्तू, संगणकाचे सुटे भाग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, कपडे यांचे स्टॉल आहेत. त्यांना जुना बाजारात असलेल्या खड्ड्यात जागा दिली जाणार आहे. उरलेल्या काही जणांना पादचारी मार्गावर जागा दिली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जुन्या बाजारातील विक्रेत्यांची संख्या
१०० - लोखंड विक्रेते 
१५० - जुने कापड विक्रेते 
७० - चप्पल-बूट 
४० - मूर्ती, भांडे विक्रेते 
५० - इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू 
५० - तयार कपडे 
५० - स्पेअरपार्ट विक्रेते 
५० - कॅसेट, रेडिओ विक्रेते 
४० - सुटकेस, पाकीट विक्रेते  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com