पुण्यात घोरपडे पेठेत इमारतीचा भाग कोसळला; हानी नाही (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

लाकूड आणि मातीचे जूने बांधकाम असलेली ही इमारत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही उर्वरित धोकादायक इमारत पाडली जाणार आहे.

पुणे :  शहरातील घोरपडे पेठेत रविवारी मध्यरात्री एका जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात घोरपडे पेठेतील तीन मजली जुनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढले. इमारतीत वीस ते पंचवीस नागरिक राहत होते. तर तिसऱ्या मजलीवर सात ते आठ कुटुंब राहत होती. 

लाकूड आणि मातीचे जूने बांधकाम असलेली ही इमारत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही उर्वरित धोकादायक इमारत पाडली जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old building in ghorpade peth collapsed in Pune

टॅग्स