पेठमधील अपघातात ज्येष्ठ दांपत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथे आज दुपारी क्रूझर जीपची स्कुटीला धडक बसून कोल्हारवाडी (ता. आंबेगाव) येथील वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. दशरथ गेणभाऊ गावडे (वय ६२) व मंदा दशरथ गावडे (वय ५५) अशी मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहेत.

दशरथ गावडे हे पत्नी मंदा यांच्यासह अवसरी खुर्द येथे लग्नासाठी गेले होते, साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर ते स्कूटीवरून (एमएच १४, बीएस ८०९२) राष्ट्रीय महामार्गावरून पेठ गावाकडे जात होते. स्कूटीला मागच्या बाजूने क्रूझर गाडीने (एमएच १४, इएच ९१३९) जोरात ठोकरले. त्यात वीस ते पंचवीस फूट अंतरापर्यंत स्कूटी फरपटत गेली. दरम्यानच्या काळात एनडीआरएफचे पथक तेथून जात होते, त्यांनी व गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलविली. पण दांपत्यांनी तत्पूर्वीच प्राण सोडले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, अशोक बाजारे, शरद एरंडे यांच्यासह ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

Web Title: old couple death in accident