Video : अन् ट्रॅ्फिक सोडवायला आजी उतरल्या रस्त्यावर !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

पुणे : सकाळी साधारण 10 वाजताची वेळ...एरंडवण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलजवळचा गुळवणी महाराज रस्त्यावर कायम नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली होती.पण, तेवढ्यात एक आजी आल्या आणि त्यांनी 2 मिनिटांत सगळी वाहतूक कोंडी सोडवली.

शहरात वाहतूक कोंडी झाली की वाहतूक पोलिस असो वा नसो कित्येकदा नागरिक स्वत: कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरतात. आज अशाच एका आजींनी तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहात वाहतूक कोंडी सोडवली.

एरंडवण्यात नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली होती. ऑफिसची वेळ म्हणून लोक कसेही वाकडे-तिकडे घुसून आपली गाडी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात करत होते. त्यामुळे कोंडीत आणखीनच भर पडत होती. तेवढ्यात एक आजी तिथे आल्या आणि वाहतूक कोंडी सोडवू लागल्या.

वाहतूक पोलिस असतानाही त्या गाड्यांसमोर थांबून, हात दाखवत, धावपळ करत गाड्यांना वाट दाखवत होत्या. त्यांच्यासमोरील तरूणाई बेशिस्त होती, पण आजींनी त्यांना योग्य वाट दाखवली. आजींचा हा आदर्श आजच्या तरुणाईने घेतला पाहिजे. 
#PuneTraffic PMC Pune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An old lady tried to solve traffic in pune