जुन्या नोटा बदलांचे अद्यापही घोंगडे भिजत 

OLD NOTE.jpg
OLD NOTE.jpg

पुणे : केंद्र सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयास शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र, देशातील जिल्हा बँकांच्या सुमारे 628 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बदलून मिळू शकलेल्या नाहीत. यामध्ये राज्यातील आठ बँकांमधील 112 कोटी रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या सर्व नोटा अद्यापही त्या त्या जिल्हा बँकांमध्ये धूळ खात पडून आहेत. 

पुणे : उसने पैसे मागितल्याने पतीला मारहाण; पत्नीचा विनयभंग

दरम्यान, याबाबत राज्यातील आठही जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, स्वतंत्र आव्हान याचिका दाखल केलेल्या आहेत; परंतु या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, अद्यापही त्यावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. 
गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रयत्न झाला होता, पण...

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याच मध्यरात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबरला सर्व बँकांना सुटी जाहीर करण्यात आली. यामुळे 8 नोव्हेंबरला दिवसभरात जमा झालेल्या नोटा जमा करण्यासाठी जिल्हा बँका 10 नोव्हेंबरला आपापले खाते असलेल्या बँकेत या नोटांचा भरणा करण्यासाठी गेल्या; परंतु जुन्या नोटा ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत, संबंधित बँकांनी त्या जमा करून घेतल्या नाहीत. मात्र, त्याबाबतचे लेखी पत्र जिल्हा बँकांना दिले. त्यानंतर 8 नोव्हेंबरला जमा झालेल्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या नव्या निर्णयामुळे जिल्हा बँकांच्या या जुन्या नोटा धूळ खात पडल्या आहेत. राज्यातील आठ बँकांमध्ये पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नागपूर, अमरावती आणि वर्धा या आठ बँकांचा समावेश आहे. 

गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रयत्न झाला होता, पण...

बॅँकनिहाय जुन्या नोटा (रुपयांत) 
- पुणे --- 22 कोटी 25 लाख 10 हजार 500 
- कोल्हापूर --- 25 कोटी 27 लाख 29 हजार 500 
- सांगली --- 14 कोटी 72 लाख 33 हजार 
- नाशिक --- 21 कोटी 32 लाख 29 हजार 
- नगर --- 11 कोटी 68 लाख 86 हजार 500 
- नागपूर --- 05 कोटी 02 लाख 98 हजार 500 
- वर्धा --- 78 लाख 61 हजार 
- अमरावती --- 11 लाख पाच हजार 500 
- एकूण --- 111 कोटी 85 लाख 1 हजार 500 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com