पुण्यात आणखी एकाकडून 1 कोटींच्या नोटा जप्त

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे- तब्बल 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये किंमतीचा काळा पैसा पांढरा (व्हाइट मनी) करून घेण्यासाठी नेत असताना पुण्यातील एका व्यापाऱ्याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. 

भरत राजमल शहा (रा. शंकरशेठ रोड, पुणे) त्यांच्याकडील एक कोटी रुपये घेऊन जात असून, ती रक्कम 25 टक्के भावाने अदलाबदल करून पांढरे करण्यासाठी लष्कर भागातील एम.जी. रोडवरील कॅनरा बँकसमोरून ही रोकड घेऊन जात असल्याचे पोलिस हवालदार लोंढे यांच्या बातमीदाराने त्यांना कळविले. 

त्यावर पोलिस उपायुक्त पंकज डहाणे व सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांना याबाबत माहिती कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुवर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अमित घुले, लोंढे, थिकोळे, जाधव, कर्पे, राऊत, भोसले, पठाण, धावडे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई केली. 

कळलेल्या ठिकाणी पोलिस गेले असता हे भरत राजमल शहा हे त्यांच्या कारमधून (MH 14 BC 6294) एक कोटी रुपये घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे 500च्या एकूण 22,444 नोटा आणि 1000च्या 28 नोटा होत्या. त्याचा पंचनामा करून ती रक्कम ताब्यात घेण्यात आली. सहायक पोलिस आयुक्तांनी आयकर विभागाचे अधिकारी के.के. मिश्रा यांना कळविले असून, आयकर विभागामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: old notes worth 1.12 crore seized in pune