Old Pension Demand : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी झेडपी कर्मचारी एकवटले

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कर्मचारी संघटना यंदा पहिल्यांदाच एकवटल्या.
Pune Zp Employee Agitation
Pune Zp Employee AgitationSakal
Summary

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कर्मचारी संघटना यंदा पहिल्यांदाच एकवटल्या.

पुणे - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कर्मचारी संघटना यंदा पहिल्यांदाच एकवटल्या. यानुसार या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन शुक्रवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या १८ संघटनांनी एकत्रित येत एक वज्रमूठ बांधली. या मोर्चात शहर व जिल्ह्यातील मिळून सुमारे १६ हजार कर्मचारी सहभागी झाले होते.

Pune Zp Employee Agitation
Teachers Agitation : शिक्षकांच्या आंदोलनामुळे मनपा शाळेवर परिणाम

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मिळून अठरा कर्मचारी संघटना कार्यरत आहेत. यामध्ये लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, ग्रामसेवक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, परिचारिका (नर्सेस), आरोग्य कर्मचारी, शाखा अभियंता, परिचर (शिपाई), लेखा संघटना, रेखाचित्र संघटना, वाहनचालक, औषध निर्माण अधिकारी, विस्तार अधिकारी आदींसह विविध संघटनांचा समावेश आहे. या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी आजच्या मोर्चात सहभागी झाले होते.

हा मोर्चा नवीन जिल्हा परिषदेच्या मुख्यालयापासून विधान भवन, साधू वासवानी चौक, सेंट्रल बिल्डींग मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नियोजन ग्रामसेवक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल कुंभार आणि जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी केले.

Pune Zp Employee Agitation
Property Tax : पुणेकरांचे २०० कोटी वाचणार

या मोर्चात जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मारणे, केशव जाधव, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे, शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार होळकर, संतोष गदादे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य सह कार्यवाहक शिवाजी खांडेकर,लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे कोशाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, नर्सेस संघटनेच्या राज्य अध्यक्षा ‍मिनाक्षी मुदगूल, वैशाली दुर्गाडे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जगताप, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, शाखा अभियंता संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मखरे, परिचर संघटनेचे अध्यक्ष मयूर येक्के, लेखा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जामदार, रेखाचित्र संघटनेचे अध्यक्ष बंडोपंत शितोळे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सणस, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोलांडे आणि विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com