पाणी गळती दुरूस्तीसाठी खोदलेला खड्डा जैसे थे

रमेश मोरे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अपघाताच्या धोक्याबरोबरच रहिवाशांचे आरोग्य धोक्यात- पाणी पुरवठा व स्थापत्य विभागाचा बेजबाबदारपणा.

अपघाताच्या धोक्याबरोबरच रहिवाशांचे आरोग्य धोक्यात- पाणी पुरवठा व स्थापत्य विभागाचा बेजबाबदारपणा.
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरातील उपनगर असलेल्या जुनी सांगवी येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटबंधारे कामगार वसाहतीजवळ पाणी पुरवठा विभागाकडुन पाणी गळतीच्या दुरूस्तीसाठी गेली अनेक महिन्यांपासुन खोदण्यात आलेला खड्डा दुरूस्त केला नसल्याने हा खड्डा धोकादायक ठरत आहे. साधारण पाच ते सहा फुट खोल व सात ते आठ फुट रूंद असलेल्या या खड्डयात पावसाचे पाणी व कचरा साचल्याने येथील रहिवाशी नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवाशी या लगतच्या रस्त्यावरून ये जा करतात.रात्रीच्या वेळेस हा खड्डा भोवतालच्या मातीच्या ढिगा-यामुळे कळुन येत नाही.येथुन शाळकरी मुलांचीही नित्याची वर्दळ असते. याबाबत संभाव्य धोकादायक खड्डयाची तात्काळ दुरूस्ती करून बुजविण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांच्या वतीने शिवशक्ती व्यायाम मंडळाचे श्री योगेश गायकवाड यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.एकीकडे शहरात फ्ल्यु,पावसाळी साथीच्या आजारात वाढ होत असताना प्रशासनाच्या बेफीकीरी बाबत येथील रहिवाशांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.तर पाणी पुरवठा व स्थापत्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने हा धोकादायक खड्डा अनेक दिवसांपासुन जैसे थे परिस्थितीत असल्याचे दिसते.याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अमर जाधव म्हणाले, पाणी गळतीच्या दुरूस्तीसाठी हा खड्डा खोदण्यात आला होता.येथील गऴती शोधुन दुरूस्ती करण्यात आली आहे.मात्र स्थापत्य विभागाकडुन चेंबर बांधुन दुरूस्ती करण्यात आली नाही.येत्या चार पाच दिवसात पावसाच्या उघडपीनंतर चेंबर करून दुरूस्ती करण्यात येईल.फोटो: जुनी सांगवी डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पाणी गळती दुरूस्ती साठी खोदण्यात आलेला खड्डा गेली अनेक दिवसांपासुन धोकादायक स्थितीत जैसे थे आहे.

Web Title: old sangavi pune news Water leak was like a dug pit for repair