जुनी सांगवीत संततधार पावसामुळे पवनाघाट पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

- गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे.

- जुनी सांगवी च्या दोन्ही बाजूला असलेल्या पवना आणि मुळा नदी पात्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

- यामुळे ठिकठिकाणी अडकलेली जलपर्णी वाहून जाण्यास मदत झाली आहे.

जुनी सांगवी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. जुनी सांगवी च्या दोन्ही बाजूला असलेल्या पवना आणि मुळा नदी पात्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी अडकलेली जलपर्णी वाहून जाण्यास मदत झाली आहे.

येथील मुळा नदी किनाऱ्यावरील पवनाघाट पाण्याखाली गेला आहे. तर येथील मुळानगरनदी किना-यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टी लगत असलेली संरक्षण भिंत साधारण तीन ते चार फूटअंतर भिजण्यापासून शिल्लक असून,  यावर्षी संरक्षण भिंती मुळे येथील झोपड्यांना काही अंशी आधार मिळाला आहे. तरी येथे पाणी वाढल्यास पाण्याचा धोका कायम आहे.

सांगवी अंतर्गत मुळा नदी किनारा रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. तर येथील शिक्षक सोसायटीच्या सिमेंट रस्त्यावरील वळणावर रस्ता खोलगट झाल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. ऐन वळणावर रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. नागरिकांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old sangvi Pangavat under rain due to incessant rains