esakal | 'जीवनाचा गाडा' ओढण्यासाठी आजीबाई ओढतेय हातगाडा! (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

'जीवनाचा गाडा' ओढण्यासाठी आजीबाई ओढतेय हातगाडा! (व्हिडिओ)

जीवन जगण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. त्यासाठी वाट्टेल ते करतात. असाच एक प्रयत्न करताना एक वृद्धा दिसत आहे. आपले जीवन व्यतित करण्यासाठी ही आजीबाई मालाने पूर्ण भरलेला गाडा ओढताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. 

'जीवनाचा गाडा' ओढण्यासाठी आजीबाई ओढतेय हातगाडा! (व्हिडिओ)

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : जीवन जगण्यासाठी अनेकजण धडपड करत असतात. त्यासाठी वाट्टेल ते करतात. असाच एक प्रयत्न करताना एक वृद्धा दिसत आहे. आपले जीवन व्यतित करण्यासाठी ही आजीबाई मालाने पूर्ण भरलेला गाडा ओढताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. 

बोडके असे संबंधित वृद्ध महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील गणेश पेठ भागात राहत असून, रविवार पेठेत ती काम करते. त्यांना मदत करावी, अशा प्रकारचे ट्विट सध्या केले गेले आहे. तसेच व्हिडिओही दिला गेला आहे. यामध्ये ही वृद्धा मालाने पूर्ण भरलेला हातगाडा ओढत आहे. ट्विटमध्ये तिला मदत करावी, असे आवाहनही केले आहे.

यामध्ये त्याने सांगितले, की ही वृद्धा पुण्यातील आहे. जीवन जगण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. तुम्ही जर पुण्यातील असाल तर जमल्यास तिला मदत करा. 

loading image
go to top