जुन्नरला द्राक्षबागेत यावर्षी किडीचा मोठा प्रादुर्भाव

greps
greps

जुन्नर - या वर्षी पाऊस कमी असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी असला तरी द्राक्ष पिकात थ्रीप्स, तुडतुडे, मिलीबग, कोळी यांसारख्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे कृषिनिष्ठ शेतकरी जितेंद्र बिडवाई यांनी सांगितले. 

जुन्नर जवळील गोळेगाव हे द्राक्षग्राम म्हणून ओळखले जाते येथे सुमारे 500 एकर क्षेत्रात विविध जातीच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.यात प्रामुख्याने शरद व जम्बो सीडलेस या निर्यातक्षम द्राक्षाचा समावेश आहे. यावर्षी मात्र जंबो सिडलेस या जातीच्या वेलीना द्राक्ष  (माल) लागण्याचे प्रमाण देखील कमी असल्याचे दिसत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे एप्रिल महिन्यात खरड छाटणीसाठी पाणी साठा राहील की नाही हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

गेल्या वर्षी अधिकच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाचा विमा देखील उतरविला होता परंतु द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नसल्याची तक्रार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वच बाजूने नुकसान होत  असून शेतकरी आर्थिकदृष्टय़ा डचणीत सापडला असल्याचे द्राक्ष उत्पादक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com