डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात दोषारोपपत्र सादर ; 2091 कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने 1600 पानी पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात सादर केले आहे.

शिरीष कुलकर्णी, अनुराधा पुरंदरे, विनय बडगंडी, केदार वांजपे, सई वांजपे, धनंजय पाचपोर यांच्या विरोधात सदर दोषारोपपत्र असून आत्तापर्यंत एकूण 2091 कोटींची फसवणूक झाल्याचे या पुरवणी दोषारोपपत्रात नमूद केले आहे.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांच्या केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी करत आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, डीएसकेंचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांच्या चौकशी करण्यात आली होती.   

Web Title: omplaint against DS Kulkarni submits; 2091 crore fraud