पुण्याला दिवासा आड पाणी पुरवठा?

पुण्याला दिवासा आड पाणी पुरवठा?

पुणे - धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता पुणे महापालिकेला ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याच्या निर्णयावर पाटबंधारे खाते ठाम असल्याने, पुणेकरांना दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा केला जाण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण शहरात ते ही केवळ चार ते पाच तास पाणीपुरवठा होणार आहे. या महिनाअखेरीला पाणीकपात लागू होण्याचा महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. 

दरम्यान, पुढील दहा दिवसांत पालकमंत्री गिरीश बापट आणि महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार असून, त्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

शहराला १३५० ऐवजी ११५० ‘एमएलडी’ पाणी देण्याची पाटबंधारे खात्याची भूमिका आहे. मात्र तो अपुरा असल्याचे सांगत महापालिका सध्या १३५० ‘एमएलडी’ इतके पाणी घेत आहे. मात्र पाटबंधारे खात्यापाठोपाठ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाने पाणीसाठ्यात कपातीची शक्‍यता वर्तविली आहे. दरम्यान, पुणेकरांना पाण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेता, त्यावर कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर पाणीकपात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोजच्या पाणीसाठ्यात २०० एमएलडी कपात झाल्यास दिवसाआड पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. बैठकीतील निर्णयानंतर त्याचे नवे वेळापत्रक केले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. 
- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com