तोंडावर स्प्रे मारुन बनावट ग्राहकाने लुटले साडे तीन लाख अमेरीकन डॉलर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे : ग्राहकास विदेशी चलन देण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारुन बनावट ग्राहकाने तरुणाकडील तब्बल तीन लाख 60 हजार रुपये किंमतीचे अमेरीकन डॉलर या विदेशी चलनाची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता कोरेगाव पार्क परिसरामध्ये घडली. 

याप्रकरणी वैभव कृष्णा पाटोळे (वय.29, रा.धायरी) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटोळे हे एका विदेशी चलन पुरवठा करणाऱ्या संस्थेमध्ये काम करीत आहेत. संबंधीत संस्था आपल्या ग्राहकांना भारतीय चलनाच्या बदल्यात विदेशी चलन घरपोच देण्याचे काम करते. फिर्यादी पाटोळे हे संबंधीत ग्राहकांना त्यांच्या घरी जाऊन विदेशी चलन देतात.

आरोपीने फिर्यादी यांच्या संस्थेशी संपर्क साधून अमेरीकन डॉलरची मागणी केली होती. त्यानुसार, फिर्यादीच्या कंपनीने फिर्यादी यांना शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता कोरेगाव पार्क परिसरातील एका इमारतीमध्ये तीन लाख 60 हजार रुपये भारतीय किंमत असलेले अमेरीकन डॉलरची बॅग घेऊन ग्राहकास देण्यासाठी त्याने सांगितलेल्या पत्त्यावर गेले. ते संबंधीत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्राहकाच्या सदनिकेजवळ गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना पैशांची बॅग विचारली. त्यानुसार, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील बॅग त्यांना दाखविली. तेवढ्यात संबंधीत ग्राहकानेच फिर्यादीच्या तोंडावर स्प्रे मारुन त्याच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून घेत तेथून पळ काढला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half million US dollars looted by a fake customer in pune