धनादेश न वटल्याने कैद

सनी सोनावळे
गुरुवार, 17 मे 2018

टाकळी ढोकेश्वर - निघोज (ता.पारनेर) येथील मळगंगा डेअरी फार्म यांना दिलेला धनादेश न वटल्याने महेश गुलाब सोनवणे यांना न्यायालयाने सहा महिन्याची साधी कैद व 1लाख 53 हजार 885 रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला, अशी माहीती अॅड. शाम असावा यांनी दिली.

असावा म्हणाले, या खटल्यातील आरोपी सोनवणे यांनी आपल्या उधारीपोटी मंळगंगा डेअरी फार्मला बँक ऑफ बडोदा पारनेर शाखेचा 1 लाख 30 हजार 411 रूपयांचा धनादेश दिला होता. पंरतु, सदरचा धनादेश मंळगंगा डेअरी फार्मने भरला असता आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने बँकेने तो मेमोसह डेअरी फार्म परत केला. त्यानंतर आरोपीस डेअरी फार्मने नोटीस देऊनही आरोपीने रक्कम अदा केली नाही. त्यामुळे आरोपी विरूद्ध दावा दाखल करण्यात आला होता. या दाव्यात फिर्यादी तर्फे दिलेला पुरावा तसेच केलेला युक्तीवादाच्या आधारे फिर्यादिने कोर्टात सदर केस सिद्ध केल्यामुळे आरोपीस सहा महिन्याची साधी कैद व नुकसान भरपाई पोटी 1 लाख 53 हजार 885 रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

फिर्यादी तर्फे अॅड.शाम असावा, अॅड.अमोल आर.डोंगरे, अॅड.दिपक पी.धोवर यांनी काम पाहीले.

Web Title: one areest for the bank check bounce

टॅग्स