पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक 

One arrested for carrying ganja in Pune
One arrested for carrying ganja in Pune

पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून साडेतेरा हजारांचा गांजा जप्त केला. तिर्थराज बबनराव केसभट (वय 41, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शनिवारी (ता. 16) दुपारी पावणे तीनच्या सुमारास चिखलीतील पूर्णानगर येथील मौर्य फोर या हॉटेलच्या समोरील रस्त्यावर एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून केसभट याला ताब्यात घेतले.  त्याच्याकडे तेरा हजार चारशे रुपये किंमतीचा 575 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com