खेळाडुकडे मागितली 25 हजाराची लाच; 'एसीबी'कडून गुन्हा दाखल, एकास अटक 

One arrested for demanding 25,000 bribes to player.jpg
One arrested for demanding 25,000 bribes to player.jpg

पुणे:  हँडबॉल खेळाडूकडे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्र हँडबॉल संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांपैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे. 

रुपेश उत्तम मोरे (वय 40) व राजेश विठ्ठल गारडे (दोघेही रा. भेकराईनगर, हडपसर) अशी 'एसीबी'ने गुन्हा दाखल केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. रुपेश मोरे यास अटक करण्यात आली आहे. याबाबत खेळाडूने "एसीबी'कडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदार हे हँडबॉल खेळाडू आहेत. त्यांनी 2017 मध्ये राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पोलीस भरती प्रक्रियेत खेळाडू प्रवर्गातून भरतीसाठी अर्ज केला होता. त्यासाठी राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे प्रमाणपत्र क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक यांच्याकडून मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र हँडबॉल संघटनेचे पदाधिकारी असलेल्या मोरे व जिल्हा हँडबॉल संघटनेचे पदाधिकारी असलेल्या गारडे यांनी 35 ते 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. 

दरम्यान, तक्रारदाराने तडजोडीत 25 हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी "एसीबी'कडे करून तक्रार नोंदविली. या प्रकरणी पडताळणी केल्यानंतर मोरे व गारडे यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. "एसीबी'चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com