महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यास धक्काबुक्की; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

दीपक उर्फ आण्णा गायकवाड (रा. ताडीवाला रस्ता ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल इचके यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : अनाधिकृत पथारीवाले व फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना महापालिकेच्या सहाय्यक अतिक्रमण अधिकाऱ्यास धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता रुबी रुग्णालयाजवळील परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकास अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीपक उर्फ आण्णा गायकवाड (रा. ताडीवाला रस्ता ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल इचके यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहूल इचके हे महापालिकेचे सहाय्यक अतिक्रमण अधिकारी आहेत. ते शनिवारी सायंकाळी पाच वाजता रुबी हॉल रुग्णालयाजवळ असणाऱ्या अनधिकृत पथारी व्यावसायिक व फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करीत होते. त्यावेळी गायकवाड याने फिर्यादी यांच्या कारवाईमध्ये अडथळा आणला. त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना धक्काबुक्की केली. गायकवाड याने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested due to Tampering with the Pune municipal officer