व्हॉट्सअॅपवर मटका चालवणाऱ्यांना अटक

one arrested for matka lotary on whatsapp
one arrested for matka lotary on whatsapp

लोणी काळभोर : ता. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड 
यांच्या पथकाने कुंजीरवाडी हद्दीत थेऊरफाटा येथे छापा टाकून व्हॉट्सअॅप वरून ऑनलाईन कल्याण मटक्याचा बेकायदा व्यवसाय उघडकीस आणला आहे. लोणी काळभोरचा माजी सरपंच चंदर रघुनाथ शेलार हा या मोबाईल मटक्याचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पोलीस हवालदार विकास दत्तात्रय लगस यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार लोणी काळभोर पोलिसांनी चंदर शेलारसह फिरोज शब्बीर शेख (वय 39, रा. थेऊर फाटा, ता. हवेली. मुळ रा. बलसुर, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद ) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. चंदर शेलार फरार असुन, फिरोज शेख यास अटक केली आहे. 

सुहास गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांचे कदम वाकवस्ती येथील कार्यालयातील वाचक, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी, पोलीस हवालदार विकास लगस व ए. डी. आतार यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंदे शोधून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवैध धंद्याची माहिती काढत असताना या पथकाला बातमीदारा मार्फत थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपूलानजीक फिरोज शेख हा मोबाईल व्हॉट्सअॅपवर कल्याण मटक्याचे आकडे घेऊन त्याचा मालक चंदर शेलार यांस मोबाईल वर पाठवून दोघे ऑनलाईन मटका घेत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. 

या माहितीची शहनिशा करण्यासाठी वरिल पथक गेले असता त्यांना रेल्वे उड्डाणपूलानजीक फिरोज शेख हा मोबाईल व्हॉट्सअॅप वर कल्याण मटका घेताना तसेच ईतर दोन-तीन इसम त्याचे शेजारी घोळका करून थांबले असल्याचे दिसून आले. पथक त्यांना पकडण्यासाठी गेले असता चाहूल लागताच ते तिघे पळून गेले. पोलिसांनी शेख याला पकडले. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली असता व्हॉट्सअॅप मध्ये एम सेट, हेमंत ट्रान्स्पोर्ट, गोरख शेट, दादा, गुरू, कष्टमर, मंगेश, टकाभाऊ या नावाने नंबर सेव्ह केले होते. त्यांवर मटक्याचे आकडे लिहून ते चंदर शेलार यांस पाठवण्यात आले होते. 

पोलिसांनी शेख याचेकडे चौकशी केली असता त्यांने मालक शेलार यांनी मला थेऊर फाटा परिसरातील हॉटेल व इतरत्र फिरून जे ओळखीचे लोक आहेत ते तुझ्या व्हॉट्सअॅप वर मटक्याचे आकडे टाकतील. व चिठ्ठीवर लिहून आणतील ते सर्व माझ्या मोबाईल वर पाठवून ग्राहकाकडून पैसे घे. यांतील ज्याचा मटका लागेल त्यांना पैसे देत जा. असे सांगितले असल्याची माहिती दिली. पथकाने त्याचेकडील 600 रुपये रोख रक्कम व असलेला मोबाईल ताब्यात घेतला आहे. मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com