गावठी पिस्तुलासह भोसरीत एकाला अटक 

संदीप घिसे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) : गावठी पिस्तुल विक्रीसाठी आणलेल्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

पिंपरी (पुणे) : गावठी पिस्तुल विक्रीसाठी आणलेल्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

विकास मनोज साके (वय 23, रा देहुगाव, ता. मावळ, जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती इंद्रायणीनगर भोसरी परिसरात पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २० हजारांचे गावठी पिस्तूल आणि एक काडतुस मिळून आले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गवारे करीत आहेत.

Web Title: One arrested with a pistol