पत्नीचा खून करणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला वानवडी पोलिसांनी 48 तासांत अटक केली.

पुणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला वानवडी पोलिसांनी 48 तासांत अटक केली. खुनाच्या घटनेनंतर आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेला होता. ही घटना रविवारी मध्यरात्री वानवडीतील महंमदवाडी येथे घडली. 

श्रीकांत कमाल चव्हाण (वय 32, रा. वाडकर मळा, महंमदवाडी, मूळ कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संगीता श्रीकांत चव्हाण (वय 26) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संगीता यांच्या आई ताराबाई राठोड (वय 50, रा. कर्नाळा, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली होती. पती श्रीकांत याने दारूच्या नशेत रविवारी पत्नी संगीताचा खून केला होता. याबाबतची माहिती पोलिस कर्मचारी संतोष राठोड यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रावसाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, राठोड, पोलिस कर्मचारी शिरीष गोसावी, प्रतीक लाहीगडे यांच्या पथकाने कर्नाळा येथे जाऊन आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भगवान कांबळे करत आहेत. 

Web Title: one arrested in pune wife murderd case