भावाला मारण्याची धमकी देत बहिणीवर बलात्कार; नराधमास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

भावाला जीवे मारण्याची धमकी देत चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी धानोरी परिसरात घडली होती. 

पुणे : भावाला जीवे मारण्याची धमकी देत चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी धानोरी परिसरात घडली होती. 

धनंजय मारपिल्ले (वय 28, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व बाललैगिंक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पीडित मुलीचे घर आरोपीच्या घराजवळ आहे.

आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्या भावास जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. हा प्रकार मुलीने तिच्या पालकांना सांगितला. दरम्यान, आरोपी हा लोहगाव येथे बहिणीकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी दुपारी आरोपीस अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested for raped a girl by threatening her to kill brother