आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह एकाला अटक

Breaking_News.jpg
Breaking_News.jpg

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळमध्ये घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम याच्या पत्नीसह एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली आहे. दुसऱ्या व्यक्तिचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे. तर पत्नीकडुन बॅंकेच्या संयुक्त खात्याचा वापर केला जात होता. या दोघाच्या अटकेमुळे या घोटाळ्याला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय 30) व प्रतिभा रमेश कदम (वय 40, रा. बोरीवली,मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गाडेकर याने सीबीआयपुढे दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तर प्रतिभा कदम यांना त्यांच्या राहत्या घरातुन अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

चार वर्षापूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद रमेश कदम सांभाळत होते. त्यावेळी त्यांनी संगनमत करून तब्बल 385 कोटी रूपयांहून अधिक रूपयांच्या आर्थिक घोटाळा केला होता. या प्रकरणचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयने याप्रकरणी कदम याच्यासह 12 जणांना अटक केली होती. दरम्यान कदम हा सध्या ठाणे येथे न्यायालयीान कोठडीमध्ये आहे. 

सीबीआयने अटक केलेल्या गाडेकर व कमलाकर ताकवले या दोघांनी सेठी ब्रदर्सचा साखर कारखाना विकत घेण्यासाठी 5 कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार केला होता. हे पाच कोटी रुपये कदम याने केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील होते. तर कदम याचे बॅॆक अकाउंट प्रतिभा कदम यांच्या नावावर संयुक्तपणे होते. त्याचा वापर त्यांच्याकडुन केला जात होता. सीआयडीच्या पथकाकडुन अनेक दिवसांपासुन कदम व गाडेकर यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com