क्रिकेट वल्डकपच्या अंतिम सामन्यावर सट्टा स्वीकारणाऱ्यास अटक

arrest.jpg
arrest.jpg

दौंड (पुणे ) : दौंड शहरात विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यावर सट्टा स्वीकारल्याप्रकरणी एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. विश्वकरंडक क्रिकेटच्या इंग्लंड व न्युझीलंड यांच्या दरम्यानच्या अंतिम सामन्यावर हा तरुण सट्टा स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आला. 

दौंड पोलिस ठाण्याचे हवालदार मारूती हिरवे यांनी आज (ता. १५) या बाबत माहिती दिली. सट्टा स्वीकारल्याप्रकरणी अमित रमेश रोहिडा (वय ३९, रा. सरस्वतीनगर, दौंड) या तरूणास रविवारी (ता. १४) अटक करण्यात आली आहे. विश्वकरंडक क्रिकेटच्या इंग्लंड व न्युझीलंड यांच्या दरम्यानच्या अंतिम सामन्यावर अमित रोहिडा हा त्याच्या गोकुळ हॅाटेल मध्ये सट्टा स्वीकारत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना मिळाल्याने त्यांनी हॅाटेल मध्ये छापा टाकला. तेथे अमित याच्याकडून दोन मोबाईल संच, रोख दोन हजार रूपये व एक नोंदवही असा एकूण पाच हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अमित रोहिडा हा मोबाईलवर सट्टा स्वीकारून तो सट्टा पुढे रियाज (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. अहमदपूर, जि. लातूर) याला देत असल्याची माहिती मिळाल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस नाईक अण्णासाहेब देशमुख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. क्रिकेट वर सट्टा खेळणाऱ्यांमध्ये दौंड तालुक्यातील काही दारू विक्रेते व वाळूचोरांचा समावेश असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. जप्त करण्यात आलेल्या नोंदवहीतील नोंदींच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com