कामाचे पैसे मिळाले नाही म्हणून एकाने घेतला गळफास; आत्महत्यांचं सत्र सुरूच!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

शंकर आणि शांताप्पा हे दोघेही एकमेकांच्या ओळखीतील होते. त्यातूनच त्यांनी भागीदारीमध्ये महापालिकेची सांडपाणी वाहिनी आणि जेन कंपनीचे जलवाहिनी टाकण्याचे काम घेतले होते. या कामामध्ये येणारा नफा दोघांनी वाटून घेण्याविषयी त्यांच्यात ठरले होते.

पुणे : महापालिकेची सांडपाणी वाहिनी आणि जलवाहिनी टाकण्याचे भागीदारीमध्ये घेतलेल्या कामाच्या नफ्याचे पैसे न देता मारहाण केल्यामुळे एका भागीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दुसऱ्या भागीदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. 

NEET Result 2020: आशिष झानते राज्यात पहिला, तर पुणेकर तेजोमय वैद्य दुसरा!​

शंकर बसवराज हुगार (वय 48, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हुगार यांच्या पत्नी लक्ष्मी हुगार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शांताप्पा हुगार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर आणि शांताप्पा हे दोघेही एकमेकांच्या ओळखीतील होते. त्यातूनच त्यांनी भागीदारीमध्ये महापालिकेची सांडपाणी वाहिनी आणि जेन कंपनीचे जलवाहिनी टाकण्याचे काम घेतले होते. या कामामध्ये येणारा नफा दोघांनी वाटून घेण्याविषयी त्यांच्यात ठरले होते. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर शांताप्पाने संबंधित कामातून मिळालेला नफा शंकर यांच्यापासून लपविला होता. तसेच त्यांच्या कामाचे 14 लाख रुपये देखील त्यांना दिले नाहीत.

कॅनरा बॅंकेची दोन एटीएम चोरट्यांनी फोडली; पळवली आठ लाखांची रोकड

दरम्यान, शंकर यांनी शांताप्पाकडे नफ्याच्या आणि कामाच्या पैशांची मागणी केली. मात्र शांताप्पाने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. तसेच शांताप्पाने शंकर यांना शिवीगाळ आणि मारहाणही केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या शंकर हुगार यांनी 30 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता हडपसरमधील शंकर मठाजवळच्या मिरेकर वस्तीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी शंकर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये शांताप्पाने आपल्याला फसविले, कामाचे पैसे दिले नाहीत, असे लिहिले होते. प्रारंभी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर शांताप्पाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One commits suicide by hanging himself for not paying for work