चिखलीत तरूणाची आत्महत्या

संदीप घिसे 
गुरुवार, 3 जानेवारी 2019

पिंपरी (पुणे) - राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे गुरूवारी सकाळी घडली.

योगेश इंदल जाधव (वय १९, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांनी गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने पंख्याच्या हुकाला गळफास घेतला. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाने ही घटना पाहिल्यावर पोलिसांना याबाबत कळविले. घटना स्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी योगेश यांना वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

योगेश हा मूळचा जळगावचा रहिवासी असून सध्या तो बहिणीकडे राहण्यास होता. बहीण शिधापत्रिका आधार कार्डास लिंक करण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी घरात एकट्या असलेल्या योगेशने गळफास घेतला. तो शहरातील एका नामांकित कंपनीत तात्पुरता कामास होता.

Web Title: one committed suicide in chikhli