खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

संदीप घिसे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) : मुद्दल आणि व्याजासाठी तरुणाच्या कुटुंबाला खासगी सावकाराने वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे घडली. या प्रकरणी खासगी सावकार आणि त्याच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी (पुणे) : मुद्दल आणि व्याजासाठी तरुणाच्या कुटुंबाला खासगी सावकाराने वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे घडली. या प्रकरणी खासगी सावकार आणि त्याच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पवन जीवन केंद्रे (वय २२, रा. मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मांडूबाब पालवे आणि गायाबाई पालवे (रा. इंद्रायणी नगर, आळंदी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जीवन किसनराव केंद्रे (वय ४२) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केंद्रे कुटुंबीयांनी आरोपी पालवे यांच्याकडून काही कारणासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची मुद्दल आणि व्याज वेळेवर न दिल्याच्या कारणावरून आरोपी मांडूबाब व गायाबाई हे केंद्रे यांच्या घरी येऊन वारंवार गोंधळ करीत असे. तसेच पैसे न दिल्यास पालवे दांपत्य आत्महत्या करण्याची धमकी देत असे. 

व्याज आणि मुद्दल न दिल्याच्या कारणावरून फिर्यादी जीवन यांचा मुलगा तिरुपती यांची दुचाकी आरोपी जबरदस्तीने घेऊन गेले. तिरूपती याची दुचाकी परत मागण्यासाठी दुसरा मुलगा पवन हा आरोपींकडे आळंदी येथे गेला असता आरोपी आरोपींनी दुचाकी दिली नाही. तसेच अपमानास्पद वागणूक दिली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पवन यांनी राहत्या घरात रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. पवन यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक विठ्ठल साळुंखे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: one committed suicide due to loan from Lenders