पिंपरीत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेवून एकाची आत्महत्या    

One committed suicide by jumping from the sixth floor of the building in pimpri
One committed suicide by jumping from the sixth floor of the building in pimpri

पिंपरी : आर्थिक चणचण व कौटूंबिक वादातून एकाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना पिंपरीगावातील पिंपरी वाघिरे कॉलनी येथे घडली.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अभिलाष भास्करन टेकूट (वय 35, रा. डी. बिल्डिंग, स्टोनरिच सोसायटी, वाघिरे कॉलनी, पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी (ता. 7) रात्री दहाच्या सुमारास अभिलाष यांनी राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी तातडीने काळेवाडी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Shocking ! पिंपरीत पाच वर्षीय चिमुकलीवर जेष्ठाकडून लैंगिक अत्याचार

अभिलाष हे पत्नी व चार वर्षीय मुलीसह येथे रहायला होते. ते हिंजवडीतील एका आयटी कंपनीत बँक ऑफिस विभागात नोकरीला होते. आर्थिक चणचणीसह त्यांच्या कुटुंबात सतत वाद असत, असे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com