जुन्नरमधील कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 29 मे 2020

- कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना आज शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.

जुन्नर : मुंबईहून औरंगपूर ता.जुन्नर येथे आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर व निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदर व्यक्ती ५८ वर्षे वयाची असून, मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी गावी आली होती. गावातील घरात ती एकटीच राहत होती. त्यांस रक्तदाब, मधुमेह, दमा, आदी आजार होते. दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते.

India coronavirus

अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना (ता. २८) काल रात्री पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्तास आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुक्यातील कोरोनाचाहा पहिला बळी ठरला आहे. एक रुग्ण बरा झाला असून, सोळा जण उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरातच थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Corona Infected Patient Died in Junnar Taluka Pune