लग्न करा पण....

kirtkatwadi1.jpg
kirtkatwadi1.jpg

पुणे : सद्यस्थितीला सगळीकडेच कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा उपाय करून कोरोनाला पूर्णविराम देता येऊ शकतो. याचेच ताजे उदाहरण म्हणजे, सिंहगड रस्त्यावरील जाधव नगर येथील वडगाव बुद्रुकमध्ये राहणाऱ्या कवडे कुटुंबियांनी आज समाजा पुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. घरात लग्नाचा योग आला होता परंतु कोरोनामुळे सगळे नियोजन बिघडले. थाटामाटात साजरे होणारे लग्न मात्र थांबले नाही.

या कुटुंबाने नातेवाईक आणि आप्तसवकीयांच्या सहवासात लग्न करण्याचे ठरवले होते. परंतु कोरोनामुळे भावनिक निराशा झाली असली तरी सामाजिक भान ते विसरले नाही. त्यामुळे वर  अभिषेक कवडे व नववधू आरती शिंदे यांच लग्न थाटात न करता अगदी साधेपणाने कवडे यांच्या राहत्या घरासमोर पार पाडण्यात आले. 

राज्यतच् नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनामुळे जैविक संकट ओढवले आहे. अशावेळी या कुटुंबीयांनी घरच्या घरी लग्नसोहळा केला. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी दिवस रात्र लढून देवदूत बनलेल्या पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व प्रशासन यांचे आभार मानत त्यांना सॅनिटायजर व मास्क देऊन सत्कार केला. तसेच यात भर म्हणून या वेळी कवडे कुटुंबियांकडून मुख्यमंत्री सहायता निधीस (कोवीड-19) एकावन्न हजार रुपयांचा धनादेश मंडल अधिकारी खडकवासला रोहिदास जाधव यांच्याकडे देण्यात आला. या लग्न सोहळ्याचे आयोजन ऋषिकेश जाधव व मित्रपरिवार यांनी केले होते. नवदाम्पत्यस आशिर्वाद देण्यासाठी नगरसेवक सचिन दोडके, अनंत दांगट आदी उपस्थित होते.


कोरोनाच्या आधी लोक आमच्या कडे वेगळ्या नजरेने पाहत होती मानसन्मान मिळत नव्हता ,परंतु कोरोनाच्या या महामारीत लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल आहे. लग्न समारंभात सन्मान पूर्वक वागणूक दिली जाते व चोळी बांगडी करून आमचा सन्मान केला जातो. त्याच प्रमाणे आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहे. लोकांनी देखील घरात राहून आम्हाला सहकार्य करावे.

-कल्पना गायकवाड, सफाई कर्मचारी.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com