पुणे : घरफोड्या करणाऱ्या सराईतास अटक, तीन लाखांचा मुद्देमालही जप्त 

पुणे : घरफोड्या करणाऱ्या सराईतास अटक, तीन लाखांचा मुद्देमालही जप्त 

पुणे : घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. 

रामा पापा जाधव (वय 24, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे राहणारे सचिन उदय राठोड हे 6 ऑगस्ट 2018 या दिवशी कार्यालयीन कामासाठी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या घराचे कडीकोयंडा उचकटून व कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेले.

याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडून सुरू होता. दरम्यान, घरफोडी करणारा आरोपी बालेवाडी येथील एका नामांकीत रुग्णालयाच्या परिसरात येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी रमेश राठोड व सागर घोरपडे यांना मिळाली.

त्यानुसार, त्यांच्या पथकाने बालेवाडी येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी अक्षय बाळू सोनवणे (रा. येरवडा) याच्या मदतीने घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यात चोरीस गेलेले एक मंगळसूत्र, दोन सोन्याच्या बांगड्या व सोनसाखळी असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com