पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- तब्बल सात वर्षांनंतर झाली शिक्षा.

- जन्मठेप आणि दोन हजारांचा दंड.

पुणे : चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विनोद नवबहाद्दूर भंडारी (वय 34, रा. गोऱ्हे बुद्रुक, हवेली) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तलाशी विनोद भंडारी (वय 25) यांचा 9 ऑक्‍टोंबर 2012 रोजी मध्यरात्री ताराई गेस्टहाऊस येथे खून झाला होता. या प्रकरणी बाळासाहेब नामदेव जावळकर (वय 39, रा. खानापूर ता. हवेली) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी सहा साक्षीदार तपासले.

भंडारी हा पत्नी तलाशी यांच्यासोबत गोऱ्हेगाव बुद्रुक येथील ताराई गेस्टहाऊस येथे आचारी म्हणून काम करत आहे. घटनेच्या 20 दिवसांपूर्वीच तो रुजू झाला होता. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये सकाळपासूनच भांडणे सुरू होते. त्यांच्या ओळखीचे प्रकाश पुरी आणि हेमंत लिंबू हे दोघे त्याचदिवशी घरी आले होते. जेवण झाल्यानंतर तिघांनी मद्यपान केले. त्यानंतर विनोदने पत्नीच्या डोक्‍यात एका हत्याराने वार करून तिचा खून केला.

खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. फिर्यादी, ताराई गेस्ट हाऊसच्या वेटरची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे व वैद्यकीय पुरावे खटल्यात महत्त्वाचे ठरले. त्याआधारे विनोदला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तब्बल सात वर्षे या खटल्याची सुनावणी चालली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One criminal gets Punishment of Life Imprisonment for Wife Murder Case