महिलेकडून एक कोटीचे सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका महिला तस्कराकडून एक कोटी रुपये किमतीचे सुमारे तीन किलो सोने जप्त केले. 

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका महिला तस्कराकडून एक कोटी रुपये किमतीचे सुमारे तीन किलो सोने जप्त केले. 

याप्रकरणी मुंबई येथील एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. रेहाना फैझान अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) असे या महिलेचे नाव आहे. सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गुरुवारी सायंकाळी जेट एअरवेजने येथील विमानतळावर उतरली. तिच्या संशयास्पद हालचालींवरून चौकशी करण्यात आली. तपासणीदरम्यान महिलेने सिंथेटिक रबराच्या सहा पाकिटांमध्ये सोने दडवून शरीराला गुंडाळून ठेवल्याचे आढळले. त्या महिलेच्या ताब्यातून तीन किलो 41 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. त्याची किंमत 98 लाख 83 हजार रुपये इतकी आहे. 

890 ग्रॅम अफू जप्त 
सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थ विभागाने अन्य एका व्यक्‍तीकडून 890 ग्रॅम अफू जप्त केला. लष्कर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली.

Web Title: One crore gold seized from the woman