अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - "एक दिवस अन्नत्याग...अन्नदात्या बळिराजासाठी' अशी साद घालत मुक्त चर्चा, भजन-कीर्तन यांचा जागर करण्यात आला. निमित्त होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी 30 वर्षांपूर्वी साहेबराव करपे यांनी कुटुंबीयांसह केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या स्मृतिदिनाचे. त्यानिमित्त आज (ता. 19) कृषी भवन येथे विविध शेतकरी संघटनांनी एकदिवसीय उपोषण केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसानपुत्र आंदोलन, शेतकरी सहवेदना समिती आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने हे आंदोलन झाले. या वेळी राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी, युवक-युवती, महिला कार्यकर्ते उपस्थित होते. 

""शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीस आसूड फटकावून जाब विचारण्याची वेळ आली आहे. शेतकरी पायाखाली येतोय, मध्यमवर्गीय नशेत आहेत. सत्ताधारी हे शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे, धोरणे राबवीत आहेत. तर विरोधी पक्ष भांडवलदारांचे लाचारी झाले आहेत. कॉर्पोरेट कर्ज एका चुटकीसरशी माफ केले जाते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर गॅरंटी मागितली जाते. जनसंसदेच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करणे आवश्‍यक आहे,'' असे मत डॉ. विश्‍वंभर चौधरी यांनी या वेळी व्यक्त करीत शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड. योगेश पांडे म्हणाले,""बुडीत असलेले सात लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ होते; परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्र्यांकडून गॅरंटी मागितली जाते. यावरून भांडवलशाही धार्जिण्या सरकारचे शेतकऱ्यांसाठी असलेले कर्जमाफीचे धोरण फसवे आहे.'' 

या वेळी अन्वर राजन, राजाभाऊ ढवाण पाटील, अनंत देशपांडे, संदीप बर्वे, सचिन पांडुळे, अभिजित फाळके, प्रकाश गोतमाळे आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. कृषिभवन ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत पदयात्रा काढत संभाजी पार्क येथे आंदोलनाचा समारोप झाला. 

अरुंधती भट्टाचार्य यांचाही निषेध 
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तर आर्थिक शिस्त बिघडेल, एकदा कर्जमाफी दिल्यास पुन्हा शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा करत बसेल. असा अजब युक्तिवाद करणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, याचाही निषेध करण्यात आला. 

Web Title: one day food sacrifice for farmer