बच्चेकंपनीसाठी ‘वन डे फन डे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

धम्माल वर्कशॉपची सोमवारी मेजवानी; मॅजिक शो आणि आंबे खाण्याची स्पर्धा

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत एक जल्लोषी दिवस अनुभवण्यासाठी ‘सकाळ’ने ‘वन डे फन डे’ या अफलातून उपक्रमाचे आयोजन केले आहे. बच्चेकंपनी व पालकांना कला आणि खेळांची भन्नाट मेजवानी देणारा हा फेस्टिव्हल पुढील सोमवारी (१ मे) होणार आहे.

धम्माल वर्कशॉपची सोमवारी मेजवानी; मॅजिक शो आणि आंबे खाण्याची स्पर्धा

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत एक जल्लोषी दिवस अनुभवण्यासाठी ‘सकाळ’ने ‘वन डे फन डे’ या अफलातून उपक्रमाचे आयोजन केले आहे. बच्चेकंपनी व पालकांना कला आणि खेळांची भन्नाट मेजवानी देणारा हा फेस्टिव्हल पुढील सोमवारी (१ मे) होणार आहे.

मुलांना उन्हाळ्याची सुटी लागल्यावर पालकांनाच मुलांच्या सुटीच्या नियोजनाचाच ताण येता; पण हा ताण भुर्रकन उडवून लावणाऱ्या आणि धमाल करण्याची संधी देणाऱ्या ‘वन डे फन डे’मधील सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. फेस्टिव्हलमध्ये एरोमॉडेलिंग, क्‍ले मॉडेलिंग, टेराकोटा हॅंगिंग शो पीस अशा कार्यशाळा होणार आहेत. मनोरंजनातून शिक्षण देणाऱ्या ह्या कार्यशाळा मुलांच्या कल्पनाशक्तीला अधिक प्रभावी बनविणाऱ्या आहेत. सहा वर्षांवरील सर्वांना यांमध्ये सहभाग होता येईल. दुपारी ३ ते सायंकाळी ९.३० या वेळात तीन सत्रांमध्ये हे उपक्रम होतील.

आंब्यांच्या या मोसमात आंबाप्रेमींसाठी खास दुपारी ४  ते सायंकाळी ६.३० या वेळेत ‘आंबे खा’ स्पर्धेचेही आयोजन केले आहे. देसाई बंधू आंबेवाले या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. बच्चेकंपनीसह मोठ्यांनाही जादूच्या प्रयोगांचे मॅजिक शोचे आकर्षण असतेच, म्हणूनच जितेंद्र रघुवीर यांचा मॅजिक शो सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत होणार आहे.

फेस्टिव्हलसाठी प्रत्येकी रु. ५० प्रवेश शुल्क आहे. कार्यशाळांसाठी वेगळे शुल्क आहे, तर मॅजिक शो सर्वांसाठी मोफत आहे. फेस्टिव्हलसाठी नावनोंदणी आता सुरू झाली आहे.

कार्यशाळा-- (दु. ३ ते सायं. ५) 
क्‍ले आर्ट : वयोगट - १२ वर्षांपुढील ः शुल्क २०० रु.
टेराकोटा हॅंगिंग शो पिस : वयोगट : ६ वर्षांपुढील : शुल्क २०० रु.
एरोमॉडेलिंग : वयोगट : ९ वर्षांपुढील : शुल्क ४०० रु.
‘आंबे खा’ स्पर्धा : वेळ ४ ते ६.३०: वयोगट : ५ ते ८ वर्ष : शुल्क ५० रु. 

‘वन डे फन डे’: सोमवार, १ मे 
कृष्णसुंदर गार्डन, म्हात्रे पूल परिसर, एरंडवणे
दुपारी ३ ते रात्री ९.३०
नोंदणीचे ठिकाण : ‘सकाळ’ची बुधवार पेठ व शिवाजीनगर येथील कार्यालये आणि कृष्णसुंदर गार्डन (सकाळी ११ ते सायंकाळी ५)
अधिक माहितीसाठी संपर्क : ९५५२५३३७१३, ८८०५००९३९५ किंवा ९५५२११८७१०.

गेली तीन वर्षे आम्ही मुलांसाठी ‘आंबे खा’ स्पर्धा आयोजित करीत आहोत. ‘सकाळ’च्या वतीने बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विविध उपक्रम होतात. त्यातच आम्हाला ही स्पर्धा घेण्याची संधी मिळाली. आंबे आणि लहान मुलांचे अतूट नाते असते. पचनशक्ती, स्मरणशक्ती, त्वचेचे आरोग्य तसेच वजनवाढीसाठी आंबा उपयुक्त ठरतो. आंब्यातून ‘सी’ आणि ‘ए’ व्हिटॅमिनबरोबर फायबरही मिळते. चांगल्या आरोग्यासाठी हंगामातला आंबा लहान मुलांनासाठीही फायदेशीर ठरतो, म्हणून आम्ही ही स्पर्धा भरवली आहे.

Web Title: one day fun day for childran