एका दिवसासाठी विद्यार्थिनी बनली महिला पोलिस अधिकारी

विद्यार्थिनी तृप्ती निबळे हिच्यासह पोलिस अधिकारी.
विद्यार्थिनी तृप्ती निबळे हिच्यासह पोलिस अधिकारी.

पिंपरी - जागतिक महिला दिनानिमित्त तृप्ती निबळे या विद्यार्थिनीला एक दिवसाची महिला पोलिस अधिकारी बनण्याचा सन्मान दिला. चिंचवड पोलिस ठाणे आणि वुमन्स हेल्पलाइन यांच्या सहकार्याने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेशी, पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे, विश्‍वजित खुळे, डॉ. अन्नपूर्णा कालिया, डॉ. रेश्‍मा रणसिंग, पोलिस अधिकारी रोहिणी शेवाळे आदी उपस्थित होते. बिर्ला हॉस्पिटल आणि सुखकर्ता यांच्या वतीने महिला पोलिस कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर व विविध रक्ततपासण्या करण्यात आल्या. याला संस्थेच्या दीपाली येवले, उज्ज्वला बोभाटे, अश्विनी निसाळ, देवयानी पाटील, सारिका परदेशी, करिष्मा कांबळे, लता सोनवणे यांचे सहकार्य लाभले.  विविध क्षेत्रांत काम करीत असलेल्या सरिता साने, सुषमा वैद्य, दीपाली येवले, गायत्री ढवळे, जनाबाई काकडे, पोलिस कर्मचारी रूपाली पुजारी, नीतू चामले यांचा सत्कार करण्यात आला.

एक हात मदतीचा, वुमन्स हेल्पलाइन ः ९८२२००१९५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com