पुण्यात वाड्याला आग लागून 1 ठार; 5 जखमी

टीम ई सकाळ
बुधवार, 3 मे 2017

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 12 बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

पुणे : शुक्रवार पेठेतील तीन मजली वाड्याला लागलेल्या भीषण आगीत एकजणाचा मृत्यू झाला. यामध्ये अग्निशमन दलाचे ४ जवानांसह एकूण 5 लोक जखमी झाले. 

आज (बुधवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास १२३५, शुक्रवार पेठ येथील तीन मजली वाड्याला भीषण आग लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 12 बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

दरम्यान, आग विझवत असताना शेजारील वाड्याची भिंत पडून अग्निशमन दलाचे ४ जवान आणि येथील एक रहिवासी जखमी झाले. 
 

Web Title: one dead, 5 injured in fire at shukrawar peth, pune

टॅग्स