नांदेड सिटीत टँकरच्या धडकेत बुलेट चालकाचा मृत्यू

pune.jpg
pune.jpg

खडकवासला : नांदेड सिटीत पाण्याचा टँकरने आणि बुलेटला धडक दिल्याने बुलेट चालक जागीच ठार झाला आहे. बुलेट चालक हे नांदेड सीटीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजेंद्र दत्तात्रय वाबळे (वय 45 रा. ग्रीन  सिटी सोसायटी, कदमवस्ती शिवणे) हे बुलेट चालत असून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वाबळे हे लष्करातून निवृत्त झालेले सैनिक आहेत. तर ते मागील काही वर्षांपासून नांदेड सिटी येथे सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होते. घटना घडली त्या वेळेस नांदेड सिटीतील पंचम सोसायटी समोर डिसी मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. 

टँकर चालक जास्त वेगाने जास्त असल्याने त्यांनी टँकर चालकाला त्यांनी 'शाळा सुटली आहे, हळू जा' असे सांगून थांबण्याचा इशारा करत होते. टँकर चालकाने न थांबता टँकर वेग वाढवून बुलेटला धडक दिली. या अपघातात वाबळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. साबळे यांनी लष्करात सात वर्षे नोकरी केली आहे त्यांची कारगिल जवळ पोस्टिंग होते. काही कारणास्तव त्यांना नोकरी अर्धवट सोडावी लागली. त्यांच्या पाठीमागे पत्नी, चार वर्षाची मुलगी व वडील असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com